Friday, 14 March 2025

भारतीय संस्कृतीत सण, उत्सवातून निसर्ग रक्षणाचा मंत्र जपला जातो. हा संदेश घेऊनच

 भारतीय संस्कृतीत सण, उत्सवातून निसर्ग रक्षणाचा मंत्र जपला जातो. हा संदेश घेऊनच

राज्यातील नागरिकांना दिल्या होळीधुलिवंदनाच्या शुभेच्छा

 

मुंबईदि. १३ :- भारतीय संस्कृतीत सणउत्सवातून निसर्ग रक्षणाचा मंत्र जपला जातो. हा संदेश घेऊनच आपण पर्यावरणपूरक रित्या सण साजरा करूया. विकसित भारतातीलविकसित महाराष्ट्र पर्यावरणीय दृष्ट्या समृद्ध होईलअसा प्रतिज्ञा घेऊयाअसे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणतातमहाराष्ट्र विकासाच्या पथावर अग्रेसर आहे. या सकारात्मक वाटचालीत येणाऱ्या आव्हानांवर मात करण्याची प्रेरणा या सणांकडून घेऊया. उत्सव साजरा करतानापर्यावरणाचा आदर करण्याचा वसा आपल्या संस्कृतीने दिला आहे. हा वसा आपण निर्धाराने पुढे नेऊया. या उत्सवांच्या काळात वृक्ष जतनजलसुरक्षा- जलसंवर्धननैसर्गिक संसाधनांचे रक्षण आणि पर्यावरणपूरक घटकांचा वापर करूया. यातून जल- वायू आणि ध्वनी प्रदूषण टाळूया. याशिवाय या सण-उत्सवांच्या निमित्ताने परस्पर आदरस्नेह-भाव वृद्धिंगत व्हावा यासाठी प्रयत्न करूया. सामाजिक-सलोखा आणि शांती-सौहार्द कायम राखण्याची आपली परंपरा आहे. ही आणखी दृढ व्हावी यासाठी एकजूटीने आणि निर्धारपूर्वक प्रयत्न करूया. या सगळ्यातून आपला विकसित महाराष्ट्र पर्यावरणीय दृष्ट्या समृद्ध होईलयासाठी कटीबद्ध राहूयाअशी भावना व्यक्त करूनमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

०००


 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi