Thursday, 27 March 2025

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांच्या कामांची राज्य गुणवत्ता निरीक्षकाकडून तपासणी

 मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांच्या कामांची

राज्य गुणवत्ता निरीक्षकाकडून तपासणी

- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

 

मुंबईदि. 26 : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी राज्य गुणवत्ता निरीक्षकाकडून नियमित काटेकोर तपासणी केली जातेअशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. रस्त्याच्या कामाचे कार्यारंभ आदेश दिल्याने हे काम सुरू झाल्यापासून पूर्ण होईपर्यंत विविध टप्प्यावर त्याची तपासणी केली जाते. काम दर्जेदार झाल्याचा अहवाल आल्यानंतरच या कामाचे देयक दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर सर्व प्रकल्प दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. या योजनांमधील कामांचे कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही कामे विलंबाने सुरू होत असल्याबाबत सदस्यांच्या भावना विचारात घेऊन भविष्यात या योजनेतील काम देताना कंत्राटदाराचा पूर्वइतिहास तपासला जाईलअसे त्यांनी सांगितले.

या संदर्भात जितेश अंतापूरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य राजेश पवारशेखर निकमसमीर कुणावारबाबुराव कदमप्रकाश सोळंके यांनी सहभाग घेतला.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi