Friday, 14 March 2025

रेडी रेकनरचे दर ठरविताना स्थानिक परिस्थितीचा विचार १० ते १५ टक्के दरवाढ होणार असल्याच्या चर्चा निराधार

 रेडी रेकनरचे दर ठरविताना स्थानिक परिस्थितीचा विचार

१० ते १५ टक्के दरवाढ होणार असल्याच्या चर्चा निराधार

- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. १२ : रेडी रेकनर दरासंदर्भात सध्या संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू आहे. मागील काही वर्षांमध्ये काही भागांमध्ये रेडी रेकनर दर वाढलेतर काही ठिकाणी दर स्थिर ठेवण्यात आले. 2023-24 आणि 2024-25 मध्ये कोणतीही दरवाढ झालेली नाही. काही माध्यमांमध्ये 10-15 टक्के दरवाढ होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेतमात्र त्या निराधार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषद सदस्य सर्वश्री सुनील शिंदेॲड.अनिल परबसचिन अहिर यांनी मालमत्तांच्या खरेदी विक्री वेळी जमा होणाऱ्या मुद्रांक शुल्क संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

राज्याच्या कोणत्याही भागात तडकाफडकी दरवाढ करण्याचा शासनाचा कोणताही हेतू नसून राज्यात दर ठरवताना स्थानिक परिस्थितीविकास दर आणि मागणी-पुरवठा यासारख्या घटकांचा विचार केला जातो. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहेज्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दर निश्चित करतात. यामध्ये गरजेनुसार काही दर कमी करण्याचा विचारही केला जातोअसे मंत्री श्री.बावनकुळे यांनी सांगितले.

मुंबईतील वेगवेगळ्या भागांमध्ये विविध प्रकारची संपत्ती असूनहाय-राईज इमारतीएसआरए प्रकल्प आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना यांच्यात मोठा फरक आहे. त्यामुळे प्रत्येक भागासाठी स्वतंत्र 'व्हॅल्यू झोनठरवले जातात. रेडी रेकनर दर ठरविताना गरीब आणि मध्यमवर्गीयांवर अन्याय होणार नाहीयाची काळजी घेतली जाणार असल्याचे मंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

यासंदर्भात राज्य सरकार जनतेच्या तक्रारी आणि सूचना गांभीर्याने घेत असून9 जानेवारी 2025 रोजी या संदर्भात बैठक झाली आहे. तसेच1 एप्रिलपूर्वी जर कोणालाही काही सूचना द्यायच्या असतीलतर त्या सरकारकडे मांडाव्यातअसे आवाहन सुद्धा मंत्री श्री.बावनकुळे यांनी केले. शासन कोणत्याही भागात अवाजवी दरवाढ करणार नाहीतसेच गरज असल्यास काही दर कमी करण्याचाही विचार केला जाईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi