Friday, 28 March 2025

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ३० मार्च रोजी महाराष्ट्र दौरा नागपुरात विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि अभिवादन कार्यक्रम

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ३० मार्च रोजी महाराष्ट्र दौरा

नागपुरात विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि अभिवादन कार्यक्रम

 

नवी दिल्ली, दि.२८ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३० मार्च रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असूननागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये अनमॅन्ड एरियल व्हेईकल्ससाठी १२५० मीटर लांबीची विशेष धावपट्टी आणि लोइटरिंग म्युनिशन चाचणीसाठी अत्याधुनिक सुविधा राष्ट्राला समर्पित केली जाणार आहे. तसेच नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत २५० खाटांचे रुग्णालय१४ बाह्यरुग्ण विभाग आणि अत्याधुनिक १४ ऑपरेशन थिएटर उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे नागपूर आणि विदर्भातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या नेत्रचिकित्सा सुविधा उपलब्ध होणार आहेत.

प्रधानमंत्री श्री.मोदी दीक्षाभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत. तसेचराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिपदा’ कार्यक्रमानिमित्त स्मृती मंदिराला भेट देऊन संघ संस्थापकांना अभिवादन करतील.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi