Monday, 24 March 2025

साकोली मतदारसंघातील पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करावी

 साकोली मतदारसंघातील पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करावी

- मंत्री गुलाबराव पाटील

 

मुंबई दि: २४ भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघातील ७५ ते ९९ टके प्रगती पथावरील पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करून कार्यान्वित कराव्या,तसेच या क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना  पूर्ण न होण्यास जबाबदार  असणाऱ्या  कंत्राटदारावर दंडात्मक करावी कारवाई करावीअसे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

साकोली विधानसभा मतदार संघातील पाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक मंत्रालयात  आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार नाना पटोलेपाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेजल जीवन मिशनचे संचालक ई.रवींद्रनसहसचिव बी जी पवारमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे मुख्य अभियंता सुभाष भुजबळभंडारा जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता विजय देशमुख व संबंधित विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले कीभंडारा जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत चालू असणाऱ्या पाणीपुरवठा योजना सद्यस्थिती आणि प्रगती पथावरील योजनांची भौतिक प्रगती पाहता या योजना तातडीने पूर्ण करून कार्यान्वित करावी असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.तसेच जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेतील योजनांची स्थिती ,जिल्हा परिषदेच्या मंजूर पाणीपुरवठा योजनेची स्थितीशंभर टक्के कार्यवाहीत घरगुती नळ जोडणीजिल्हा निहाय हर घर जल सद्यस्थितीजलजीवन मिशन सुधारित योजनाखर्चाची सद्यस्थितीचा आढावा मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी घेतला.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi