Thursday, 27 March 2025

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे महिला व बाल रुग्णालय मंजूर करण्याबाबत लवकरच निर्णय

 चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे महिला व बाल रुग्णालय

मंजूर करण्याबाबत लवकरच निर्णय

- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबईदि. २६ : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे नवीन महिला व बाल रुग्णालय धोरणानुसार प्रस्तावित आहे. हे रुग्णालय मंजूर करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य समीर कुणावार यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी योगेश सागरविक्रम पाचपुतेबाळा नर यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणालेअहिल्यानगर जिल्ह्यासाठी प्रस्तावित बाल रुग्णालय आणि श्रीगोंदा शहरात 100 खाटांचे रुग्णालय यासंदर्भात आराखडा तयार करण्यात आला असूनहा विषय प्राधान्याने सोडविण्यात येणार आहे. राज्यातील प्रस्तावित रुग्णालयाबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi