Wednesday, 5 March 2025

नागपुरातील दोन मुलांचा एचएमपीव्ही तपासणी अहवाल ' निगेटिव्ह ' -

 नागपुरातील दोन मुलांचा एचएमपीव्ही तपासणी अहवाल निगेटिव्ह '

- सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबईदि. 5 :  ह्यूमन मेटॅन्यूमो  व्हायरस (एचएमपीव्ही) हा नवीन श्वसन विषाणू नसून 2001 पासून प्रचलित आहे. एचएमपीव्ही हा साधारणतः सौम्य आजार आहे. या आजारामुळे नागपुरात दोन मुले बाधित झाल्याची माहिती समोर आली होती. ही मुले पहिल्या टप्प्यात खासगी रुग्णालयातील तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आली. त्यानंतर शासकीय महाविद्यालयनागपूर येथील तपासणीमध्ये  बॉर्डर लाईन''ला आढळून आली. त्यानंतर नागपूर एम्समध्ये  तपासणी केली असता त्यांचे तपासणी अहवाल  एचएमपीव्ही निगेटिव्ह आढळून आलेअशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

राज्यात एचएमपीव्ही विषाणू रोखण्याकरिता करावयाच्या उपाययोजनांबाबत सदस्य डॉ नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

 या प्रश्नाच्या उत्तरात माहिती देताना सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणालेएचएमपीव्ही हा सौम्य स्वरूपाचा आजार असून ज्यामध्ये सर्दीखोकल्यासारखी लक्षणे असतात. राज्यात हा आजार आटोक्यात  आहे. या आजाराबाबत केंद्र शासनासोबत समन्वय ठेवून आजारासंदर्भातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे आणि नागरिकांना आश्वस्त करण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi