Saturday, 1 March 2025

राज्यात वाहनांची ' एचएसआरपी ' प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांतील दरांप्रमाणेच नंबर प्लेट लावण्यासाठी निवडलेल्या कंपन्यां pl share ची निविदा प्रक्रिया नियमानुसार

 राज्यात वाहनांची एचएसआरपी प्लेट लावण्याचे दर 

अन्य राज्यांतील दरांप्रमाणेच

नंबर प्लेट लावण्यासाठी निवडलेल्या कंपन्यांची निविदा प्रक्रिया नियमानुसार

 

मुंबईदि. २८ : देशातील बहुतेक राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातही ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातील दुचाकीतीन चाकीचार चाकी व जड वाहनांसाठी हे नंबर प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांमधील दराप्रमाणेच आहे

 

राज्यात एचएसआरपी लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. उच्चाधिकार समितीने  कंपन्यांचे दर अंतिम केले आहेत. मान्य झालेल्या दरानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाने कार्यारंभ आदेश जारी केले. राज्यात ठरवून दिलेले दर हे 'एचएसआरपी नंबर प्लेट व फिटमेंट चार्जेससह आहेत.

 

अन्य राज्यात जीएसटी वगळून दुचाकीचे दर प्रतिवाहन ४२० ते ४८० रुपयेतीन चाकी वाहन ४५० ते ५५०चार चाकी वाहन व जड वाहने ६९० ते ८०० रुपये आहेत. तर राज्यामध्ये जीएसटी वगळून दुचाकी प्रतिवाहन ४५० रुपयेतीन चाकी ५००चार चाकी व जड वाहने ७४५ रुपये आहे. यावरून राज्यातील दर अन्य राज्यांमधील दरांप्रमाणेच असल्याचे दिसून येते.

 

 केंद्रीय मोटार नियम १९८९ चे नियमानुसार सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविणे बंधनकारक आहे. वाहन विक्रेत्याकडून ०१एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. मात्र ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार लावणे बंधनकारक आहे.

 

 तसेच काही राज्यातील दर फिटमेंट चार्जेसशिवाय आहेत. या दरांची माहिती भारतीय वाहन उद्योगाच्या एसआयएएम (SIAM) या संकेतस्थळावर उपलब्ध आहेअसे परिवहन विभागाने कळविले आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi