Sunday, 9 March 2025

पतंजली प्रकल्पामुळे रोजगार व संत्र्याला बाजारपेठ




 पतंजली प्रकल्पामुळे रोजगार व संत्र्याला बाजारपेठ

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

            पतंजलीच्या मिहान स्थित फुड आणि हर्बल प्रकल्पासाठी दिवसाला जवळपास 800 टन संत्र्यांची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला आपसुकच बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. या प्रकल्पास शेतकऱ्याचे पूर्ण सहकार्य लाभेल व लिंबुवर्गीय फळांचा पुरवठाही करण्यात येईल. या प्रकल्पाद्वारे शेतकरी समृद्ध होण्यास मदत होईलअसेही त्यांनी सांगितले. उत्तम संत्रा बीज आणि कलम निर्मितीसाठी आधुनिक नर्सरी उभारण्याची मागणी त्यांनी यावेळी राज्य शासनाकडे केली.

तत्पूर्वीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पतंजली फुड आणि हर्बल पार्कच्या कौनशिलेचे अनावरण आणि प्रकल्पाचे विधीवत उद्घाटन झाले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi