प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये
महाराष्ट्र राज्य देशात अव्वल
- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
योजनेच्या माध्यमातून २२६३ कोटीची राज्यात गुंतवणूक,
लाभार्थीना ३८९ कोटी अनुदानाचे वितरण
मुंबई, दि. 25 : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र राज्य देशात अव्वल असून राज्यात एकूण २२ हजार ०१० प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग असून छत्रपती संभाजीनगरमध्ये १८९५ सर्वाधिक प्रकल्प मंजूर आहेत. देशात २२००० टप्पा पार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसहित सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषि व अन्न प्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र राज्याने उत्कृष्ट कामगिरी केलेली असून देशात अव्वल स्थान मिळवले आहे. ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थी या योजनेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत अशी माहिती कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी दिली.
बिहार राज्याचे २१२४८ प्रकल्प मंजुर असुन ते देशात दुसऱ्या स्थानावर तर उत्तर प्रदेशचे १५४४९ प्रकल्प मंजूर असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र राज्यात प्रकल्प मंजुरीमध्ये छत्रपती संभाजीनगर प्रथम क्रमांकावर, अहिल्यानगर द्वितीय क्रमांकावर आणि सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या योजनेच्या माध्यमातून रु. २२६३ कोटीची गुंतवणूक राज्यात झाली आहे रु. ३८९ कोटीचे अनुदान लाभार्थींना देण्यात आले आहे.
नव्याने
No comments:
Post a Comment