Friday, 21 March 2025

धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारणारण्यासाठी कार्यवाही करावी

 धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारणारण्यासाठी कार्यवाही करावी

-         परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. २० : "बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा" या तत्त्वावर खासगी विकासकांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात धाराशिव येथे भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करावी. याचबरोबरच येरमाळा व उमरगा येथील बसस्थानक देखील विकसित करण्यात यावे. असे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ते  विधिमंडळात प्रांगणात धाराशिव जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या संदर्भात बैठकीत बोलत होते. बैठकीला तुळजापूरचे  आमदार राणा जगजितसिंग पाटीलयांच्या सह एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणालेराज्यातील एस. टी. महामंडळाच्या विविध जागा भविष्यात बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर खासगी विकासाच्या मार्फत विकसित करण्यात येणार आहेत.या जागांचे शहरीनिमशहरी व ग्रामीण असे तीन गट तयार केले असून या तीन गटातील प्रत्येकी एक बसस्थानक याप्रमाणे तीन बस स्थानकाचे एक समूह करून त्यासाठी निविदा मागवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यभरातील ६० पेक्षा जास्त बस स्थानकांची निविदा मागवली जाणार असून त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिवयेरमाळा व उमरगा या बसस्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. सुसज्ज बसस्थानकप्रसाधनगृहकर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह याबरोबरच अद्यावत आगार या आगारामध्ये इलेक्ट्रिक बसेस चार्जिंग स्टेशनसोलर प्लांटवॉटर हार्वेस्टिंग यासारख्या सुविधा असणार आहेत, असे परिवहन मंत्री श्री सरनाईक यांनी सांगितले.

यासंदर्भातील निविदा प्रक्रिया लवकरच राबविली जाणार असून बस स्थानकाच्या कामाला देखील लगेच सुरुवात केली जाईलअसे मंत्री सरनाईक सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi