गोंड राजे बख्त बुलंद शाह समाधी स्थळ सुशोभीकरणासाठी
नागपूर सुधार प्रन्यासने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश
- उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. २० :- गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या समाधी स्थळाचे सुशोभीकरण सुधारण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी ९ कोटी ७२ लाखाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी नागपूर सुधार प्रन्यास ने (NIT) हा निधी तात्काळ मंजूर करावा, असे निर्देश देण्यात आले असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तराच्या वेळी दिले.
सदस्य भीमराम केराम यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य प्रवीण दटके यांनीही सहभाग घेतला.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले, गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या समाधी स्थळी कोणतेही अतिक्रमण नाही. मात्र सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा विचार करून, जर अतिक्रमण असेल तर ते तत्काळ हटवण्याचे आदेश दिले जातील, असे उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment