पुढील एक महिन्यात नाशिकचे मेळा बसस्थानक समस्यामुक्त करावे
नाशिक शहरातील एसटी महामंडळाच्या समस्यां बाबतीत आमदार देवयानी फरांदे यांनी निवेदन सादर केले. प्रसाधनगृहे, बसस्थानक व परिसर स्वच्छता करुन नवीन बांधलेल्या मेळा बसस्थानक एक महिन्यांमध्ये समस्यामुक्त करावे असे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले. आमदार फरांदे यांच्या मागणीनुसार महामार्ग बसस्थानकाचा विकास सिंहस्थ निधीतून करण्याबाबत शासनस्तरावर विचार करण्यात येईल. तसेच मेळा बसस्थानकाच्या समस्यांवरही सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असेही परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment