Friday, 7 March 2025

राज्यातील होर्डिंग्जचे दरवर्षी ऑडिट होणार

 राज्यातील होर्डिंग्जचे दरवर्षी ऑडिट होणार

- उद्योग मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. ७ :- राज्यातील आणि मुंबईतील धोकादायक असणारी एक लाख ९ हजार ३८७ होर्डिंग आतापर्यंत काढून टाकण्यात आली असून राज्याच्या होर्डिंग धोरणामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात होर्डिंग पडून दुर्दैवी घटना घडली. अशा घटना राज्यात घडू नयेत यासाठी अधिकृत आणि अनधिकृत सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकेकडून करण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी  विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

   याबाबतचा प्रश्न सदस्य योगेश सागर यांनी उपस्थित केला होता. यावेळी सदस्य विजय वडेट्टीवारअमित साटमजितेंद्र आव्हाडसुभाष देशमुखचेतन तुपेवरूण सरदेसाई यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणालेराज्यातील महानगरपालिकेत बृहन्मुंबई महानगरपालिका व नगरपरिषदनगरपंचायती क्षेत्राकरिता वेगवेगळे जाहिरात धोरण निर्गमित करण्यात आले आहे. घाटकोपर दुर्घटनेनंतर या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याबाबत तसेच अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याची कार्यवाही तात्काळ करण्याबाबत सूचना सर्व महानगरपालिका व नगरपरिषदनगरपंचायतींना देण्यात आली आहे. तसेच अनधिकृत होर्डिंगउंच लोखंडी मनोरेमोबाईल टॉवरलोखंडी कार पार्किंग मनोरे इत्यादीचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

   राज्यात एकूण ९ हजार २६ ठिकाणी होर्डिंग्जचे ऑडिट करण्यात आले आहे.  राज्यात १ लाख ९ हजार ३८७ होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले आहेतयाप्रकरणी ज्यांनी सहकार्य केले नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे एकूण ५९ गुन्हे दाखल झाले आहेत. महापालिका क्षेत्रात ४८ गुन्हे तर नगरपालिका क्षेत्रात ११ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले

   यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्यासगळ्या महानगरपालिका आणि नगरपरिषदांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर सगळ्या महानगरपालिकांचे ऑडिट रिपोर्ट आलेले आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi