नाशिकच्या पंड्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणावर कडक कारवाई
- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. १९ : नाशिक येथील पंड्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचे एक गंभीर प्रकरण उघडकीस आले असून, त्यावर तातडीने कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
यासंदर्भात विधान परिषद सदस्य डॉ.मनिषा कायंदे, प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास मंत्री आबिटकर यांनी उत्तर दिले.
आरोग्यमंत्री श्री.आबिटकर म्हणाले की, या प्रकरणात संबंधित डॉक्टरांनी गैरवर्तन केल्याचे आणि हॉस्पिटलकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. तसेच, याप्रकरणी भारतीय न्याय संहिता अन्य कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या पंड्या हॉस्पिटलने आवश्यक परवानग्या व अन्य परवानग्या न घेता उपचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी डॉक्टर तानाजी चव्हाण आणि डॉक्टर प्रशांत शेटे यांची तात्काळ बदली करण्यात येणार आहे. तसेच 15 दिवसांच्या आत आयुक्तांमार्फत चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल, असे आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment