भिवंडीतील माता आणि बाल रुग्णालयाच्या बांधकामास गती देणार
- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. १२ : भिवंडी येथे माता आणि बाल रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून या इमारतीचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देऊन या कामाला अधिक गती देण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य रईस शेख यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भिवंडी येथे माता आणि बाल रुग्णालयाच्या नव्या विंगचे बांधकाम सुरू करण्यात आले होते मात्र, प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर पावसाळ्याच्या अडथळ्यांमुळे काम थांबले होते. या कामाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची विशेष पथक प्रत्यक्ष पाहणी करेल. पाहणीनंतर एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना या अधिकाऱ्यांना देण्यात येतील. प्राप्त अहवालानुसार या कामाला अधिक गती देऊन भिवंडी परिसरात अत्याधुनिक आणि सुसज्ज रुग्णालय उभारण्यास प्राधान्य दिले जाईल. जेणेकरून स्थानिक नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होतील, असे मंत्री मंत्री आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले.
0000
No comments:
Post a Comment