सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी सेवा सक्षम करण्यासाठी
लवकरच मिनी बसेस उपलब्ध करून देणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग डोंगराळ, दुर्गम जिल्हा असून वाहतुकीसाठी एस टी बस हा एकमेव आधार आहे. त्यामुळे बस सेवा सुरळीतपणे चालू रहावी व प्रवाशांची गैरसोय टाळून त्यांना एसटी बसची सेवा मिळावी, यासाठी भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मिनी बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात. या मागणीला परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानक व बस गाड्यांच्या विविध अडचणीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
No comments:
Post a Comment