चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील
वाहन हस्तांतरण प्रक्रियेतील दोषींवर कारवाई
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. १८ :- चंद्रपूर आरटीओ कार्यालयात वाहन हस्तांतरण प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई करत दोषींवर गुन्हे दाखल केले आहेत. परिवहन विभागाने चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजात आवश्यक सुधारणा करण्यावर भर दिला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
चंद्रपूर आरटीओ कार्यालयातील कामकाजाबाबत सदस्य किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती.
या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहने हस्तांतरण प्रक्रियेबाबत आणखी चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच चंद्रपूर आरटीओच्या नियुक्तीबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निकालानंतर कार्यवाही केली जाईल.
No comments:
Post a Comment