वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट- सप्टेंबर २०२४ कालावधीत
अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी ७३.८७ कोटी निधी मंजूर
- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
मुंबई, दि. २० :- वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे ६५ हजार ४८४ शेतकऱ्यांच्या ५३,८३५.३२ हेक्टर क्षेत्रावरील झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी ७३.८७ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानसभेत दिली.या संदर्भात सदस्य सई डहाके यांनी लक्षवेधी उपस्थीत केली होती.
मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी शासन नेहमीच खंबीरपणे उभे राहते. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जिरायती पिकाच्या नुकसानीसाठी रुपये १३ हजार ६०० प्रति हेक्टर, बागायती पिकाच्या नुकसानीसाठी रुपये २७००० प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी रूप ३६००० प्रति हेक्टर मदत देण्यात येते. तसेच ही मदत केंद्र शासनाच्या दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेत वाढवण्यात आली असल्याचे मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.
मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले, वाशिम जिल्ह्यासाठी फेब्रुवारी मार्च व एप्रिल २०२४ कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना १४.१५ कोटी इतका निधी प्रत्यक्षात वितरित केला आहे. मे २०२४ या मध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी ७.१३ लक्ष इतका निधी शेतकऱ्यांना वितरीत केला आहे. तर जून- जुलै २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी ६९.५४ लक्ष इतका निधी शेतकऱ्यांना वितरीत केला आहे.
0000
No comments:
Post a Comment