अमली पदार्थ विरोधी कक्ष
प्रत्येक पोलीस स्टेशनला अमली पदार्थ विरोधी सेल सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून अमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि साठवणुकीवर कारवाई करण्यात येत आहे. अमली पदार्थ विषयी गुन्ह्यांमध्ये पोलिस आढळून आल्यास संबंधित पोलिसाला बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बंद रासायनिक कंपन्यांना नियमित भेट देण्यात येत आहे. यासाठी एमआयडीसीलाही सूचित करण्यात आले आहे. कोडीम घटक आधारित सिरप अमली पदार्थ म्हणून वापरण्यात येते. हे सिरप मेडिकल दुकानदारांनी प्रिस्क्रिप्शन शिवाय न देण्याचे बंधन टाकण्यात आले आहे तसेच त्याचे रेकॉर्डही ठेवाण्यास सांगितले आहे. यामुळे या सिरपची आयात कमी झाल्याचे दिसून येते. गुप्त माहितीच्या आधारे सिंथेटिक ड्रग' वर पण कारवाई करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment