Tuesday, 4 March 2025

बृहन्मुंबई महापालिकेच्या २ लाख कोटींच्या विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

 बृहन्मुंबई महापालिकेच्या २ लाख कोटींच्या

विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

- प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवा

- हाजीअली येथे २ हजार क्षमतेचे वाहनतळ उभारा

- प्रस्तावित प्रकल्पांच्या टेंडरची कामे महिन्याभरात पूर्ण करा

 

मुंबईदि. ४ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या सुमारे  लाख ४१ हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित २५ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या नाले सफाईच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

विधानभवनात झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणीनगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्तामहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारवन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरमहापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त श्री. गगराणी यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे विविध प्रकल्पांच्या सद्यःस्थितीची माहिती दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने पायाभूत सुविधापाणीपुरवठा प्रकल्पमलनिःसारण प्रकल्पआरोग्य विभागाचे १ लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये ७०० किमी किलोमीटर रस्त्यांचे कॉक्रिटीकरणाची कामेवर्सोवा ते भाईंदर सागरी किनारी मार्गगोरेगाव मुलुंड लिंक रोडसह गोखले पूलविक्रोळी पूलकर्नाक पूलसायन पूलमढ वर्सोवा पूल आदी पुलांची कामेदहीसरपोईसरओशिवरा नदी पुनर्जिविकरण व मिठी नदी स्वच्छता प्रकल्पयासह पाणीपुरवठा प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच वर्सोवामालाडभांडूपघाटकोपर येथील मलजल उदचन केंद्रवर्सोवा मलजल बोगदामिठी नदी पॅकेज मलजल बोगदा व प्राधान्य मलजल बोगदा या सात मलःनिसारण प्रकल्पांचाही समावेश आहे.  याशिवाय आरोग्य विभागाच्यावतीने सायन केईएमसायन व नायर रुग्णालयांचे पुनर्विकास व नवीन रुग्णालयांची उभारणीदहिसर पश्चिम द्रुतगती मार्गावरील ऑक्ट्रॉय नाका व मानखुर्द येथे वाहनतळ व व्यावसायिक केंद्र उभारणे या प्रकल्पांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

तसेच निक्षारीकरण प्रकल्पमिठी नदी पॅकेज ५पांजरापोळ जलशुद्धीकरण प्रकल्पदहिसर उद्यान विकासमानखुर्द वाहतूक केंद्रजिजामाता उद्यान विस्तारीकरण व मुलुंड पक्षी संग्रहालयदेवनार बायोमायनिंगदेवनार पशुवध आधुनिकीकरणमध्यवर्ती उद्यान पायाभूत सुविधा व गारगाई पाणीपुरवठा प्रकल्प या सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi