Wednesday, 19 March 2025

चंद्रभागा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी 'नमामि चंद्रभागा' अभियान -

 चंद्रभागा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी 'नमामि चंद्रभागाअभियान

- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

मुंबईदि. १८ : पंढरपूर हे दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या पवित्र ठिकाणी असलेली चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त असायला पाहिजे. केंद्र शासनाच्या 'नमामि गंगाया नदी शुद्धीकरण प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात चंद्रभागा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी 'नमामि चंद्रभागाअभियान राबविण्यात येत आहेअसे पर्यावरण वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

चंद्रभागा नदीच्या प्रदूषणाबाबत सदस्य अभिजीत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य समाधान आवताडेराजू खरे यांनीही सहभाग घेतला.

या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'नमामी चंद्रभागाअभियानांतर्गत 48.25 कोटी किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने 34.65 कोटी इतका निधी वितरित केला आहे. या योजनेअंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन व अनुषंगिक कामे प्रगतीपथावर आहेत. चंद्रभागेच्या प्रदूषणाबाबत तक्रार आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. पंढरपूर शहर तसेच आजूबाजूच्या परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

पंढरपूर शहरातून वाहणाऱ्या चंद्रभागेच्या प्रदूषणाबाबत पंढरपूर शहराचा दौरा करून परिस्थितीची पाहणी करण्यात येईल. याबाबत आढावा घेण्यात येईल. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागजलसंपदा विभाग या संबंधित विभागांनाही यावेळी आमंत्रित केले जाईलअसेही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi