Friday, 28 March 2025

नोंदीत बांधकाम कामगारांसाठी निवृत्ती वेतन • कामगार मंत्री आकाश पुंडकर यांचे विधानसभेत निवेदन

 नोंदीत बांधकाम कामगारांसाठी निवृत्ती वेतन

•       कामगार मंत्री आकाश पुंडकर यांचे विधानसभेत निवेदन

 

मुंबईदि. 25 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगारांना निवृत्ती वेतन देण्याबाबतचे निवेदन कामगार मंत्री आकाश पुंडकर यांनी विधानसभेत केले.

इमारत व इतर बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या हिताच्या रक्षणार्थ केंद्र शासनाने 1996 मध्ये कायदा  केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने सन 2007 मध्ये नियम बनविले. या नियमांतर्गत 2011 मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळमुंबई स्थापना करण्यात आले.

वय 18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदीत करुन घेतले जाते व त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी होऊ शकत नाही व त्यांना कोणताही मिळत नाही.

ही बाब विचारात घेऊन मंडळाकडे नोंदीत असलेल्या व वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12000 रुपये इतके निवृत्तीवेतन देण्यात येईल. यामध्ये 10 वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना 50 टक्केच्या मर्यादेत प्रतिवर्षी 6000 रुपये,  15 वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर 75 टक्केच्या मर्यादेत प्रतिवर्षी 9000 रुपये आणि 20 वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी 12000 रुपये इतके निवृत्तीवेतन देण्यात येईल.

 कायद्यामधील तरतूदी व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन याबाबतची सविस्तर कार्यपध्दती निश्चित करण्यात येईल.

सध्या मंडळाकडे नोंदीत असलेल्या 58 लाख बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांचे भवितव्य या योजनेमुळे सुरक्षित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi