Monday, 17 February 2025

अंगणवाडीत साजरी होणार शिवजयंती -

 अंगणवाडीत साजरी होणार शिवजयंती

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई, दि. 17 : राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी अंगणवाडीतील बालकांनाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती समजावी व त्यांच्या बालमनावर महाराजांच्या कार्याचे संस्कार व्हावेयाकरिता अंगणवाड्यांमध्येही मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे. यावेळी बालकांना शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या गोष्टी सांगण्यात येतील तसेच राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान असे अनुषांगिक उपक्रमही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi