Friday, 14 February 2025

राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी 

१५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई, 13 : राष्ट्र व राज्य निर्माणमध्ये युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग,संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवकांमध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे,  त्यांनी  केलेल्या सामाजित कार्याला प्रोत्साहन देऊन त्यांचा गुणगौरव शासनामार्फत करण्यात येतो. राज्याचे युवा धोरण अंतर्गत  राज्य युवा पुरस्कार शासनामार्फत देण्यात येतो. या पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

सन २०२३-२४ या वर्षात राज्यस्तरावर राज्य युवा पुरस्कार क्रिडा विभागाच्या क्षेत्रीय विभागस्तर नुसार प्रत्येक विभागातील  १ युवक१ युवती  व १ नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे स्वरूप युवक-युवती यांना रोख रुपये ५० हजार व संस्थेस १ लाख तसेच गौरवपत्रसन्मानचिन्ह असे राहणार आहे.

राज्य युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांची गत तीन वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे मुल्यांकन विचारात घेण्यात येणार असून राज्य युवक पुरस्कार सन २०२३-२४ साठी अर्ज दि. १५ फेब्रुवारी२०२५ रोजी कार्यालयीन कामकाज दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण भरलेल्या विहीत अर्जाची प्रतआवश्यक छायांकित केलेली कागदपत्रे (सत्यप्रत केलेली)तीन पासपोर्ट फोटो इ. सर्व कागदपत्रे पुस्तिकेच्या स्वरूपात एकत्रित करून बंद लिफाफ्यात कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयमुंबई उपनगरशारीरिक शिक्षण महाविद्यालय परिसरसमता नगरकांदिवलीमुंबई येथे सादर करावे. अधिक माहितीसाठी ०२२-२०८९०७१७ या कमांकाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

मुंबई उपनगर जिल्ह्यातून युवक व युक्ती तसेच नोंदणीकृत संस्थांनी प्रस्ताव या कार्यालयात सादर करावेअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारीमुंबई उपनगर यांनी केले आहे. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर किंवा https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील. राज्यातील जास्तीत जास्त युवा व युवा विकासाचे कार्य करणा या संस्थांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयमहाराष्ट्र राज्याचे आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

 

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi