Sunday, 16 February 2025

कुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकतेचा योग

 कुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकतेचा योग

                                                            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूरदि. १६ - प्रयागराज येथे सनातन संस्कृतीचे भव्य दर्शन घडविणारा कुंभमेळा सुरू आहे. आस्थेचा असा भव्य संगम जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. मानवी संस्कृती आणि सभ्यतेमध्ये हजारो वर्षापासून हा संगम आपल्याला कुंभमेळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळतो. भाविक जातभाषापंथ विसरून कुंभमेळ्यात एकत्रित येतात. त्यामुळे हा समाजाच्या एकतेचा योग असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शहरातील रेशीमबाग मैदानात आयोजित  'महाकुंभ प्रयाग योगकार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

50 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी आतापर्यंत कुंभमेळ्यात स्नान केले. ज्या भाविकांना कुंभमेळ्यात जाण्याचा योग आला नाही त्यांच्यासाठी प्रयागराज येथील संगमावरील जल नागपुरात आणण्यात आले आहे. यासाठी महाकुंभ प्रयाग योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

आजवर कोट्यवधी भाविकांनी महाकुंभादरम्यान प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले आहे. पण ज्यांना तेथे जाणे शक्य नाही अशांनाही या पवित्र संगम जलाच्या स्नानाची अनुभूती व्हावी या अनुषंगाने प्रयागराज येथील जल रामटेकमार्गे नागपुरात आणण्यात आले होते.  या अनुषंगाने  महाकुंभ प्रयाग योग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास द सत्संग फाउंडेशन, नागपूर केंद्राचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रेराजेश लोयाअमेय हेटे आदी यावेळी उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi