Thursday, 20 February 2025

त्रिपुराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही बांबू लागवड मिशन प्रभावीपणे राबवू

 त्रिपुराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही बांबू लागवड मिशन प्रभावीपणे राबवू

- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

·         पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे त्रिपुराच्या दौऱ्यावर;

·         बांबू हस्तकला प्रदर्शनाला भेट

 

मुंबईदि. १८ - महाराष्ट्राच्या हवामान व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून, शास्त्रीय दृष्टीची सांगड घालून महाराष्ट्र राज्यात बांबू मिशन अमलबजावणी प्रभावीपणे राबवूअसे पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या त्रिपुरा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राज्यमंत्री माधुरी मिसाळपर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होत्या.

आगरताळा येथील बांबू लागवड प्रदर्शनाला भेट देऊन मंत्री पर्यावरण श्रीमती पंकजा मुंडे यांनी महिलांच्या हस्तकला कौशल्याचे भरभरून कौतुक केले. तसेच विविध जातीच्या बांबू लागवडीची यावेळी पाहणी केली.

त्रिपुरातील बांबू हस्तकला देशातील सर्वोत्तम हस्तकलेपैकी एक आहे. तसेच अगरबत्ती बनवण्यासाठी बांबूच्या काड्यांसाठी संपूर्ण देशाच्या गरजांपैकी बहुतांशी गरज या राज्यातून पूर्ण केली जाते. बांबू क्षेत्राच्या एकात्मिक विकासासाठीपीपीपी फ्रेमवर्क अंतर्गत२००७ मध्ये त्रिपुरा बांबू मिशन (टीबीएम) सुरू करण्यात आले होते.

त्रिपुरा बांबू हस्तकला उत्कृष्ट डिझाइनविस्तृत श्रेणीतील उत्पादनांसाठी आणि कलात्मक आकर्षणासाठी देशातील सर्वोत्तम मानल्या जातात. या प्रदर्शनात विविध जातीच्या बांबूच्या लागवडीचे आणि हस्तकला कौशल्याची पाहणी केल्यानंतर मंत्री पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या हवामान व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून राज्यात बांबू मिशनची अमलबजावणीचा करण्यात येईल, असे सांगितले.

            श्रीमती मुंडे यांचे आगरतळा विमानतळावर शासकीय वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी यांनी स्वागत केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi