Tuesday, 25 February 2025

चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात विभागीय आयुक्तांनी समिती स्थापन करून प्रस्ताव

 प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वन विभागाकडून सहकार्य करण्याचे वनमंत्र्यांचे आश्वासन

चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात

विभागीय आयुक्तांनी समिती स्थापन करून प्रस्ताव सादर करावे

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

            मुंबईदि. 25 : कोल्हापुरातील चांदोली अभयारण्यासाठी जमिन दिलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून तातडीने प्रस्ताव तयार करून मंत्रीमंडळांच्या मंजुरीसाठी पाठवावेअसे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

            चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भातील प्रलंबित बाबीसंदर्भात महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात बैठक झाली. यावेळी वनमंत्री गणेश नाईकप्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी भारत पाटणकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            चांदोली अभयारण्यात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पुनर्वसनासंदर्भात प्रलंबित विषय सोडविण्यासाठी पुनर्वसन कायद्यातील 11 ते 14 कलमांच्या अधिसूचनेसंदर्भात योग्य तो मार्ग काढून प्रकल्पग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हाधिकारीवन विभागाचे अधिकारी तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी यांची समिती स्थापन करून या समितीने अर्थसंकल्पिय अधिवेशनानंतर एक महिन्यात मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव आणावाअसे निर्देश यावेळी देण्यात आले.

चांदोली अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भातील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी वन विभागाच्या वतीने संपूर्ण सहकार्य केले जाईलअसे वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी सांगितले.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi