Friday, 14 February 2025

महालक्ष्मी सरसच्या रंगतदार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीचा तडका

 महालक्ष्मी सरसच्या रंगतदार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीचा तडका

 

मुंबईदि.१४ : मुंबईतील बीकेसीवांद्रे पूर्व येथे महालक्ष्मी सरसमध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध हस्तकलाचविष्ट पारंपरिक पदार्थ आणि ग्रामीण उद्योजकांच्या उत्कृष्ट उत्पादनांचा भव्य संगम पहायला मिळत आहे. याच भव्य सोहळ्यात मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली.

 बांद्रा कुर्ला संकुल येथे ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – २०२५ चे आयोजन. दि. ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीभार्गवी चिरमुले आणि

करिश्मा तन्ना यांची खास भेट!

मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि भार्गवी चिरमुले यांच्यासह हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्ना यांनी महालक्ष्मी सरसला विशेष भेट दिली. त्यांनी नाविन्यपूर्ण स्टॉल्सना भेट देऊन ग्रामीण उद्योजकांशी संवाद साधला आणि गावाकडच्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. 

"गाव बोलावतो" चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर लाँच!

७ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या "गाव बोलावतो" चित्रपटाचा दमदार टीझर महालक्ष्मी सरसच्या भव्य मंचावर लाँच करण्यात आला. उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर  यांच्या हस्ते AV प्ले च्या माध्यमातून हा टीझर प्रदर्शित करण्यात आला. 

या सोहळ्यात चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद माणिकरावनिर्माते प्रशांत मधुकर नरोडे आणि शंतनु श्रीकांत भाके यांच्यासह मुख्य कलाकार भूषण प्रधानश्रीकांत यादव किरण शरदउमेद अभियानाचे अवर सचिव धनवंत माळी  यांची विशेष उपस्थिती होती.

०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi