```मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील तिसरी भाषा आहे. २००१ सालच्या खानेसुमारीनुसार मराठी बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा ९व्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मिती संस्कृतपासून झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे.```
_*मराठी भाषा दिवस*_
```मराठीतील पहिला ग्रंथ महानुभव पंथाचे चक्रधर स्वामी यांचे चरित्र स्वरूपात आला आहे
*मराठी भाषा दिन चक्रधर स्वामीं*
*यांचे नातं सांगणारा असावा*
त्याचबरोबर संत तुकाराम संत चोखामेळा संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत गाडगेबाबा अशा महान संतांनी बोली भाषेतमराठी भाषा रुजवली फुलवली
_*रांगणाऱ्या तान्हुल्यापरी*_
_*गोंडस निरागस मराठी*_
_*तळपणाऱ्या दिनकरापरी*_
_*प्रखर अन् तेजस मराठी*_
_*ऊब देई आईच्यापरी*_
_*हळवी अन् लोभस मराठी*_
_*ओळखावी विश्वभर ही*_
_*गोजिरी सालस मराठी*_
_*मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...*_ 💐
No comments:
Post a Comment