Monday, 17 February 2025

खर्डा गावातील मदारी वसाहतींचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावे

 खर्डा गावातील मदारी वसाहतींचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावे

- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

 

मुंबईदि. 17 : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत  जामखेड तालुक्यातील खर्डा गावात २० मुस्लीम मदारी कुटुंबियांच्या वसाहतीसाठी निधीस मंजूरी देण्यात आली. ३१ मार्च पर्यंत या कामाला गती देऊन वसाहतीचे काम पूर्ण करावेअसे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

विधानपरिषद येथे मौजे खर्डा (ता. जामखेड) अहिल्यानगर जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत मदारी वसाहतीच्या कामासंदर्भात आढावा घेण्यात आला. त्यावेळी सभापती प्रा. राम शिंदे बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेइतर मागासवर्ग कल्याण विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिल्लारीप्रादेशिक उपसंचालक भगवान वीरसहाय्यक संचालक विनोद लोंढेखर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनी पाटीलकृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटीलमाजी सभापती रवींद्र सुरवसेग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदेमहालिंग कोरेमहेश दिंडोरे व खर्डा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

            सभापती प्रा. राम शिंदे  म्हणाले कीयशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत जामखेड तालुक्यातील खर्डा गावात २० मुस्लीम मदारी कुटुंबियासाठी वसाहतीसाठी २०१८ ला निधीचे वितरण करण्यात आले. हे काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी नव्याने निविदा प्रकिया राबवूनस्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन पूर्ण करावे.

मदारी वसाहतीचे काम हा राज्यातील पहिला  प्रकल्प आहे. त्यामुळे या वसाहतीचे काम उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण करावे. तसेच वसाहतीच्या ठिकाणी तेथील नागरिकांना आवश्यक सुविधा देखील उपलब्ध करून द्याव्यातअशी सूचनाही सभापती प्रा. शिंदे यांनी केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi