Wednesday, 12 February 2025

मुंबईत होणार जागतिक मनोरंजन क्षेत्राचे ‘वेव्ज 2025’ संमेलन ‘वेव्ज’ संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य

 मुंबईत होणार जागतिक मनोरंजन क्षेत्राचे वेव्ज 2025’ संमेलन

वेव्ज’ संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 11 : केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने मुंबईमध्ये ऑडीओ व्हिज्युअल एंटरटेंटमेंट समिट (वेव्ज) 2025 या मनोरंजन क्षेत्रातील जागतिक संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.  1 ते 4 मे 2025 दरम्यान जिओ कन्व्हेक्शन सेंटर’ येथे हे संमेलन होईल. जगाला भारताच्या मनोरंजन विश्वातील कला गुणसृजनशीलता दाखविण्याची ही नामी संधी आहे. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑडीओ व्हिज्युअल एंटरटेंटमेंट समिट (वेव्ज) बाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले.

 

             पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात’ कार्यक्रमात या संमेलनाचा उल्लेख केला आहे. कलाचित्रपटमाध्यमेमनोरंजन क्षेत्रातील भारताची सृजनशीलता खूप मोठी आहे. भारताची ही नवी ओळख जगाला करून देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी संकल्पना आहे. ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी या संमेलनाच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभारही मानले.

 

            मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.  बैठकीस सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलारमुख्य सचिव सुजाता सौनिककेंद्रीय माहिती व प्रसारण सचिव संजय जाजूप्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हितेश जैनगृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहलराजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकरमुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेमुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीनगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ताविशेष पोलीस देवेन भारती आदी उपस्थित होते.

 

            संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी राज्य शासनाकडून समन्वयासाठी एक आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. केंद्रीय प्रसारण मंत्रालयाच्या सेाहळा आयोजनाच्या अनुषंगाने असणाऱ्या आवश्यकताअडचणीराज्य शासनाकडून असणाऱ्या अपेक्षा यासाठी नियमित संवादासाठी यंत्रणा तयार करावीअशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

 

            'वेव्ज संमेलनात प्रदर्शन असणार आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी विशेष दालनाची व्यवस्था करावी. या दालनातून महाराष्ट्राचे कलाविश्व जगाला दाखवावे. परिषदेसाठी जगातून येणाऱ्या मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीमत्वाचे स्वागत महाराष्ट्र करेलअशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. केंद्रीय सचिव जाजू यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून परिषदेची माहिती दिली. बैठकीस सांस्कृतिक कार्यराजशिष्टाचारपर्यटन व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi