Tuesday, 7 January 2025

महाराष्ट्र परिचय केंद्र येथे मराठी पत्रकार दिन

 महाराष्ट्र परिचय केंद्र येथे मराठी पत्रकार दिन

 

             नवी दिल्ली 6  : महाराष्ट्र परिचय केंद्र येथे  मराठी पत्रकार दिनानिमित्त प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनीही जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

            आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण’ या  मराठी आणि इंग्रजी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून दर्पणच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवीन जीवनमूल्ये रूजविली. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi