Wednesday, 8 January 2025

बिहारमधील बावनबुटी साडी बनवणाऱ्या विणकर महिलांच्या आर्थिक उन्नतीमध्ये योगदानाबद्दल गौरव जानकीदेवी बजाज पुरस्काराने वीणा उपाध्याय राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

 बिहारमधील बावनबुटी साडी बनवणाऱ्या विणकर महिलांच्या

 आर्थिक उन्नतीमध्ये योगदानाबद्दल गौरव

जानकीदेवी बजाज पुरस्काराने वीणा उपाध्याय राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

 

मुंबई, दि. 8 : आयएमसी चेंबर महिला विभागातर्फे देण्यात येणारा 31 वा. 'जानकीदेवी बजाज पुरस्कारश्रीजनी फाउंडेशनच्या संस्थापिका वीणा उपाध्याय यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

श्रीमती उपाध्याय यांनी बावनबुटी साडी विणणाऱ्या महिला कारागिरांना प्रोत्साहन देऊन या कलेचे पुनरुज्जीवन करताना बिहारमधील ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविल्याने हा पुरस्कार मिळत आहे.

आयएमसी सभागृहात मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाला आयएमसी महिला विभागाच्या अध्यक्ष ज्योती दोशीउपाध्यक्ष राज्यलक्ष्मी रावजानकीदेवी बजाज पुरस्कार समितीच्या अध्यक्षा नयनतारा जैनउद्योगपती शेखर बजाजनीरज बजाज तसेच बजाज कुटुंबातील सदस्य व निमंत्रित उपस्थित होते.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi