Tuesday, 28 January 2025

जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपीची प्रभावी अंमलबजाणी करावी

 जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी

एसओपीची प्रभावी अंमलबजाणी करावी

- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

 मुंबईदि. २८ : जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपीची प्रभावी अंमलबजाणी  करावी. तसेच जीबीएस रुग्णांची दैनंदिन अद्ययावत माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त यांना सादर करावीअशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीत दिल्या.

मंत्रालय येथे जीबीएस विषाणूच्या प्रादुर्भावबाबत झालेल्या आढावा बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकरवैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवालेआयुषचे संचालक डॉ.रमण घुंगराळेकर आदी प्रत्यक्ष तर सर्व शासकीय वैद्यकीयआयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता तसेच टास्क फोर्सचे अध्यक्ष दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणालेया विषाणूबाबत नागरिकांमध्ये उपाययोजनांसाठी जनजागृती करण्यात यावी. ज्यामुळे विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आरोग्य यंत्रणांनी देखील आवश्यक औषध पुरवठा आणि साधनसामुग्री उपलब्ध करून घ्यावीअसेही यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

 

 *जीबीएस आजाराची सर्वसाधारण लक्षणे :*

अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी किंवा लकवा

अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी

जास्त दिवसांचा डायरिया

अशा प्रकारचे लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सरकारी रुग्णालयात तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात.

*जीबीएस विषाणुपासून बचावाच्या उपाययोजना :*

पाण्याचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून प्यावे.

ताजे आणि स्वच्छ अन्न पदार्थांचे सेवन करावे. संसर्ग टाळण्यासाठी शिजवलेले आणि न शिजवलेले अन्नपदार्थ एकत्र ठेवू नये.

वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.

00000000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi