Tuesday, 7 January 2025

दर घोटाळा: कोट्यवधींची फसवणूक करून, गुंतवणूकदारांची

*दा

दर घोटाळा: कोट्यवधींची फसवणूक करून, गुंतवणूकदारांची फसवणूक करून टोरेस ज्वेलरीचा मालक फरार* दादर येथील टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. कंपनीने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आल्यामुळे, गुंतवणूकदार आता आपल्या मूळ रकमा परत मिळवण्याची मागणी करत आहेत. अनेक गुंतवणूकदारांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला काही देयके दिल्यानंतर, मागील दोन आठवड्यांपासून कोणतेही हप्ते मिळालेले नाहीत. यामुळे गुंतवणूकदार निराश झाले आहेत. कंपनीकडून कोणताही संपर्क किंवा माहिती मिळत नसल्याने गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. टोरेस कंपनीने गेल्या वर्षभरात मुंबईतील विविध भागांमध्ये 10% परताव्याचे आकर्षक आश्वासन दिले होते. मात्र, अलीकडे देयके थांबवल्याने गुंतवणूकदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. संतप्त गुंतवणूकदार आता मूळ रकमेच्या परताव्याची मागणी करत आहेत आणि सांगत आहेत की, "आम्हाला व्याज नको, फक्त आमचे पैसे परत द्या." अहवालांनुसार, नागरिकांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, कंपनीचा मालक सध्या परदेशात असल्याचे समजते. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी जमलेली असतानाही *शिवाजी पार्क दादर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून आले आहे. दादर येथील शिवाजी पार्क पोलीस स्टेशन हे नेहमी अशा घोटाळ्यांमध्ये दुर्लक्ष करत असते व कारवाई करण्यास हलगर्जीपणा आणि दिरंगाई दाखवत असते. अद्याप कोणताही गुन्हा नोंदवला गेला नाही, तसेच कोणत्याही चौकशीचे आदेश देण्यात आलेले नाहीत.* *या प्रकरणावर आधारस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष सतीश थोरात यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी प्रशासन आणि स्थानिक नेत्यांवर टीका करत म्हटले आहे की, "दादरसारख्या ठिकाणी एवढा मोठा घोटाळा उघडपणे घडत असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी शांत आहेत. गरीब फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी हेच अधिकारी तत्पर असतात, मग कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?"* *सतीश थोरात यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, टोरेस कंपनीसारख्या घोटाळ्यांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी. अशा आर्थिक घोटाळ्यांविरोधात ठोस पावले उचलून जनतेला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi