Friday, 10 January 2025

नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शहरांच्या विकासाचे उद्दिष्ट ठेवावेमी

 नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी 

शहरांच्या विकासाचे उद्दिष्ट ठेवावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नगरविकास विभागाच्या १०० दिवसांच्या कामांचे सादरीकरण

 

            मुंबईदि. ९ - राज्यातील ४२३ शहरांमधील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी या शहरांमध्ये सर्व अत्यावश्यक आणि दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

नगरविकास विभागामार्फत येत्या १०० दिवसात करावयाची कामे आणि उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सादरीकरणाद्वारे चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमाहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारमृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडकामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकरवित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वालमृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईकनगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळमुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेप्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव डॉ.श्रीकर परदेशीवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवराउपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोनानगरविकास - विभागाचे प्रधान सचिव डॉ. के.एच.गोविंदराज आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीराज्यात शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. तथापि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या शहरांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देताना घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन करणे बंधनकारक करावे. सर्व नगरपरिषदांमधील मालमत्तांचे जीआयएस प्रणाली आधारित कर निर्धारणामध्ये सुधारणा करताना नियोजन करून तो दीडपटीपेक्षा अधिक होणार नाहीयाची दक्षता घ्यावीअशा सूचना त्यांनी केल्या. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याच्या पुनर्वापराचे पारदर्शी धोरण ठरवाअसेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणालेनागरिकांना सोयी सुविधा देताना त्यावर कर आकारला जातो. तथापिहा कर अनेक वर्षांनंतर सुधारित केला तर नागरिकांवर त्याचा अधिक बोजा पडतो. यासाठी त्यामध्ये नियमित परंतु अल्पवृद्धी करावीजेणेकरून तो भरणे नागरिकांना शक्य होईल.

            प्रधान सचिव डॉ.गोविंदराज यांनी सादरीकरणाद्वारे विभागाच्या १०० दिवसांच्या नियोजनाबाबत माहिती दिली. यानुसार शहरांच्या शाश्वत विकासासाठी धोरण निश्चितीनागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजनाप्रशासकीय सुधारणा आणि बळकटीकरणई-गव्हर्नन्स प्रकल्पांना चालनातसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर उत्पन्न वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi