Wednesday, 1 January 2025

नववर्षासोबत गडचिरोलीत विकासाची नवी पहाट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माओवाद्यांनी संविधानाचा मार्ग स्विाकारावा

 नववर्षासोबत गडचिरोलीत विकासाची नवी पहाट

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माओवाद्यांनी संविधानाचा मार्ग स्विाकारावा

* ताराक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरण

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षात प्रथमच अहेरी-गर्देवाडा बससेवा सुरु

* लॉईडच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ6200 कोटींची गुंतवणूक9000 रोजगार

* कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे 1000 कोटींचे समभाग प्रदान

* गडचिरोलीपासून 200 कि.मी. दूर पेनगुंडा येथे जवानग्रामस्थांशी संवाद

* सी-60 जवानांचाही सत्कार

* पोलीस दलाला ५ बस१४ चारचाकी३० मोटारसायकलीचे ‍लोकार्पण

गडचिरोलीदि. 1  : नववर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीसाठी विकासाची नवीन पहाट घेवून आला असून विकासाच्या,  सामाजिक सलोख्याच्याशांततेच्या आणि औद्योगीकरणाच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल सुरू राहीलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

नवीन वर्षाचा पहिला दिवस मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात व्यतित केला. त्यांच्या उपस्थितीत जहाल नक्षली ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांत प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी बससेवेचा त्यांनी शुभारंभ केला आणि त्या बसमधून प्रवासही केला. लॉईडच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यातून 6 हजार 200 कोटींची गुंतवणूक होत असूनचार हजारावर रोजगारनिर्मिती होत आहे. 

आज सकाळी गडचिरोली जिल्ह्यात आगमन झाल्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे थेट ताडगुडा ब्रीज येथे गेले. गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग तसेच ताडगुडा पुलाचे त्यांनी लोकार्पण केले. पेनगुंडा येथे त्यांनी जवानांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. हा परिसर अतिदुर्गम व नक्षलप्रभावीत मानला जातो. थेट मुख्यमंत्र्यांनी त्याठिकाणी जाऊन एक वेगळा संदेश दिला. या भागात जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री आहेत.

त्यानंतर दुपारी कोनसरी येथेलॉईड्सच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यात कोनसरी येथे डीआयआय प्लांट (400 कोटी रुपये गुंतवणूक700 रोजगार)पेलेट प्लांट आणि स्लरी पाईपलाईन (3000 कोटी रुपये गुंतवणूक1000 रोजगार)हेडरीएटापल्ली येथे आयर्न ओअर ग्राईडिंग प्लांट (2 हजार 700 कोटी रुपये गुंतवणूक1 हजार 500 रोजगार)वन्या गारमेंट युनिट (20 कोटी रुपये गुंतवणूक600 रोजगार) याचा समावेश आहे. शिवाय लॉईडस काली अम्मल हॉस्पीटल आणि लॉईडस राज विद्यानिकेतन सीबीएसई शाळेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केला. सुमारे 1 हजार 200 विद्यार्थ्यांना येथे शिक्षण मिळणार आहे. पोलिसांसाठी निवासस्थानेजिमखानाबालोद्यान इत्यादींचेही लोकार्पण करण्यात आले. कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे 1000 कोटींचे समभाग प्रदान करुन एकप्रकारे मालकी देण्याचाही स्तुत्य उपक्रम लॉईड्सने हाती घेतला. हे समभाग मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

गडचिरोलीत ग्रीन माईनिंगचाही शुभारंभ करण्यात आला. यातून खाणींचे संरक्षण होणार असून लोहखनिजासाठी स्लरी पाईपलाईनमुळे इंधन बचत होणारकार्बन उर्त्सजन कमी होणाररस्त्यावरील अपघातही कमी होणार आहेत. ग्रीन माईनिंगचा प्रयोग देशातून गडचिरोलीत प्रथमच राबविण्यात येत आहे. गोंडवाना विद्यापीठ ऑस्ट्रेलियन विद्यापीठाशी एक करार करणार असूनत्यातून मायनिंगशी संबंधित सर्व अभ्यासक्रम सुरु करण्यात येतील. यातून गडचिरोलीतील तरुणांना रोजगार मिळणार आहेअशीही माहिती, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi