Saturday, 4 January 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नो युवर आर्मी’ मेळाव्याचे उद्धाटन राष्ट्रीय सुरक्षिततेबाबत भारतीय सैन्यदल सक्षम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नो युवर आर्मी मेळाव्याचे उद्धाटन

राष्ट्रीय सुरक्षिततेबाबत भारतीय सैन्यदल सक्षम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पुणेदि.  3 : भारत राष्ट्रीय सुरक्षिततेच्या अनुषंगाने अंतर्गत आणि बाह्यबाजूने मजबूत आहे;  भारतीय सेना जगातील उत्तम सेनेपैकी एक असून भूजल व वायू अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्यास प्रतिकार करण्यास सैन्यदल सक्षम आहेअसे गौरवोउद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

 

'समर्थ भारत सक्षम सेनाया प्रेरक संकल्पनेअंतर्गत दक्षिण कमांडच्यावतीने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथे आयोजित 'नो युवर आर्मीमेळाव्याच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार प्रा. मेधा कुलकर्णीआमदार सुनील  कांबळेदक्षिण कमांडचे  आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल धीरज सेठपोलीस आयुक्त अमितेश कुमारपुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेजिल्हाधिकारी जितेंद्र डूडीराज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक आंचल दलालजिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल सतीश हंगेमाजी राज्य मंत्री दिलीप कांबळेमाजी आमदार विलास लांडे,आदी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेया मेळाव्यात भारतीय सैन्यदलाच्या क्षमता आणि संरक्षण क्षेत्रात चाललेल्या स्टार्टअप आणि नवोन्मेषाचे सुरू असलेले प्रचंड काम पाहायला मिळत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांना भारतीय सैनिकांशी संवाद साधता येणार आहेशिवाय युवकांना भारतीय सैन्यदलात भरती होण्याच्यादृष्टीने प्रेरणा मिळणार आहे. भारतात संरक्षण क्षेत्रात सुरक्षितेतच्यादृष्टीने निर्माण केलेल्या विविध अत्याधुनिक उपकरणांची माहिती देणारे प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भारतीय सैन्यदलाचे यांनी अभिनंदन केले.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केंद्रीय संचार ब्युरोच्यावतीने भारतीय सैन्याचे साहसशौर्याच्या क्षमतेचे दर्शन घडविणाऱ्या  छायाचित्रांचे बहुमाध्यम प्रदर्शनास भेट देवून माहिती जाणून घेतली. तसेच परिसरातील विविध संरक्षण विषयक अत्याधुनिक शस्त्रेरणगाडेउपकरणाची पाहणी करुन माहिती घेतली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi