Saturday, 4 January 2025

सायबर सुरक्षा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना पुढील 100 दिवसांमध्ये गृहविभागाने करावयाच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

 सायबर सुरक्षा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

 

पुढील 100 दिवसांमध्ये गृहविभागाने करावयाच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

 

मुंबईदि. 4 : महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी पूर्ण क्षमतेने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे गृह विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेसायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित गव्हर्नन्सरिस्क व कंम्प्लायन्स करण्यात यावे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स करिता नवीन पदे निर्माण करावी. नक्षलविरोधी उपक्रमांमध्ये नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये नवीन सशस्त्र चौक्या उभारण्याच्या कामाला गती द्यावी तसेच केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र कारागृह नियमावलीचे प्रारुप तयार करण्यात यावेअशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त सर्व प्रयोग शाळांचे संगणकीकरण करणे सुरू आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये मुंबईपुणेनागपूरछत्रपती संभाजीनगरनाशिक या पाच प्रयोग शाळांचे संगणकीकरण तसेच प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे प्रकल्पाचे डाटा सेंटर उभारण्यात आले आहेअशी माहिती गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल यांनी दिली. यावर अमरावतीकोल्हापूरनांदेडठाणेधुळेसोलापूररत्नागिरीचंद्रपूर या प्रयोगशाळांचे संगणकीकरण करावेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या बैठकीस कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढागृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ.पंकज भोयरगृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदममुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेगृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहलअपर मुख्य सचिव ओ पी गुप्तामुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशीतसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi