भवताल मासिक : डिसेंबर २०२४
नमस्कार,
‘भवताल मासिका’चा डिसेंबर २०२४ चा अंक प्रसिद्ध झाला असून, त्यात पुढील विषयांचा समावेश आहे.
* ‘अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स’चा अदृश्य विळखा सोडवण्यासाठी
अँटिबायोटिक औषधांना न जुमानणारे गंभीर जीवाणू विकसित होण्याची क्रिया अदृश्यपणे सुरू आहे. त्यातून ‘अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स’चा गंभीर विळखा घट्ट होत चालला आहे. त्याचा परिणाम म्हणून जगभरात लाखो मृत्यू होत आहेत. हा विळखा सोडवण्यासाठी जागरुकता आणि कृती यांची आवश्यकता आहे. या विषयावरील विवेचन...
- अभिजित घोरपडे
* दीडशे वर्षांपूर्वी मुंबई होती तरी कशी?
मुंबई महानगरात शंभर ते दोनशे वर्षांपूर्वी वाघाचे अस्तित्व होते, यावर विश्वास ठेवणे कठीणच! मात्र, हे वास्तव आहे. दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी मुंबईचे वन्य जीवन समृद्ध होते, असे अनेक जुन्या नोंदी आणि लिखाणावरून निदर्शनास येते. तेव्हा, अर्थात १८०० ते १९५० या दीडशे वर्षांच्या कालखंडात मुंबई होती तरी कशी? याचा हा आढावा...
- संजीव नलावडे
* भवताल : देवाण-घेवाण विशेषांक
‘भवताल’चा यंदाचा दहावा दिवाळी विशेषांक. ‘देवाणघेवाण’ ही वेगळी थीम. आगळा-वेगळा महाराष्ट्र जगापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न. हा अंक महाराष्ट्रासंदर्भात दस्तावेज तर आहेच, शिवाय ‘भवताल’ने भूमिका घेऊन केलेले स्टेटमेंटसुद्धा !
* भवताल बुलेटिन
भवतालचे विविध उपक्रम व घडामोडींची माहिती देणारे सदर...
* इको अपडेट्स
अवतीभवतीच्या पर्यावरणीय घटनांचा आढावा.
.........
सोबत अंकाची पीडीएफ प्रत, कव्हर आणि नावनोंदणी करण्यासाठीची लिंक शेअर करत आहोत. कव्हर व नावनोंदणीची लिंक आपल्या संपर्कात शेअर करावी आणि नावनोंदणी करण्याचे आवाहन करावे.
मासिकाच्या नावनोंदणीसाठी लिंकः
(आम्ही आपणाला 'भवताल मासिका'ची २०२५ या वर्षाची रु. ७९० इतकी वर्गणी भरण्याचे आवाहन करत आहोत, जेणेकरून आम्हाला त्याचा दर्जा यापुढेही टिकवण्यास मदत होईल.)
वर्गणी भरण्यासाठी QR code:
बँकेचे तपशील:
अकाउंट नेम- Bhavatal Foundation
अकाउंट नंबर- 033805009849
IFS Code- ICIC0000338
No comments:
Post a Comment