Sunday, 29 December 2024

राज्यातील हवाई दळणवळण वाढविण्यासाठी विमानतळ प्रकल्पांच्या कामांना गती द्या

 राज्यातील हवाई दळणवळण वाढविण्यासाठी

विमानतळ प्रकल्पांच्या कामांना गती द्या

                                            - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 28 :- राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रस्तेजलहवाई मार्गांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. राज्याचा प्रत्येक भाग विमानाने जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांचे विस्तारीकरण करण्याच्या कामाला गती देण्यात यावी. या कामांना केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाकडून भरीव स्वरुपाचे सहकार्य केले जाईलअशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

 

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पार पडली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीराज्यात हवाई वाहतुकीच्या वाढीला मोठा वाव आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या उडाण योजनेसह राज्याच्या निधीतून विमानतळांचा विकासत्यांचे विस्तारीकणनाईट लँडिंगची सुविधाधावपट्टीची लांबी वाढविणेविमानतळांवर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे यासारख्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे. रिलायंसच्या ताब्यात असणारी विमानतळे राज्याच्या ताब्यात घेण्यासाठी महाराष्ट्र उद्योग विकास मंडळाने तातडीने कार्यवाही करावी. मोठ्या शहरांतील विमानतळांवरील भार कमी करण्यासाठी राज्याच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने युद्धपातळीवर कार्यवाही करावीअसे निर्देशही त्यांनी दिले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरीशिर्डीअमरावती (बेलोरा)पुरंदरकराडचंद्रपूर (मोरवा)सोलापूरधुळेफलटणअकोलागडचिरोली या विमानतळांच्या कामांच्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा देखील घेतला. मिहान क्षेत्रांतर्गत येणाऱ्या जीएमआर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी देण्यात येणाऱ्या 786.56 हेक्टर क्षेत्रासंदर्भात करावयाच्या कराराचा आढावा घेतला. यासंदर्भातील करार लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

बैठकीस वाहतूक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठीवित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्तानगरविकासचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगलमहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडेउद्योग विभागाचे सचिव अन्बलगनएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासूनागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर आदी उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi