Tuesday, 3 December 2024

सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देशभरातून येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी

 सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश

देशभरातून येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी

 

मुंबईदि. ३ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे येतात. त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावेअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यानमहापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहिर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी करावयाच्या सोयी सुविधांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. मुख्य सचिव सुजाता सौनिकमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमारपोलीस महासंचालक रश्मी शुक्लाबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणीमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.गोविंदराजगृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार सिंगसामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारेसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुतेकोकण विभागीय आयुक्त डॉ.राजेश देशमुखमुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्यासह संबंधित विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यांसह पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरभदंत डॉ.राहुल बोधीसंबंधित विविध यंत्रणांचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले कीबाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यांना भोजनस्वच्छ आणि पुरेशी स्वच्छतागृहेवैद्यकीय सुविधाराहण्याची सुविधावाहतूक व्यवस्थामदत आणि समन्वय कक्षसुरक्षा व्यवस्था आदी सोयी सुविधा पुरविण्यात येतात. या सुविधा पुरविताना कोणत्याही अनुयायाची गैरसोय होणार नाहीयाची सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावीअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

महापरिनिर्वाण दिनाशी संबंधित सर्व समित्यांचे नेहमीच सहकार्य राहिले आहेत्यांच्या सूचनांची दखल घेऊन सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन करण्यात यावे. परिसरात पूर्ण स्वच्छता राखण्यात यावी. विविध रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष उभारण्यात यावेतअशा सुचनाही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिल्या.

माजी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, दरवर्षी चांगली सुविधा देण्यात येते. यावर्षीही कोणतीही कमतरता राहणार नाहीयासाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करावेत. भोजनआरोग्यपाणीस्वच्छता तसेच सुरक्षा आदी सुविधा दर्जेदार द्याव्यात. स्थानिक समित्यांचे नेहमीच सहकार्य राहते. त्यांच्या सूचनांही योग्य प्रकारे अमलात आणाव्यात. संवेदनशीलता ठेवून चांगल्या प्रकारे नियोजन करावे.

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी प्रारंभी चैत्यभूमी परिसरात आजपर्यंत झालेल्या सोयी सुविधांच्या कामांचा आढावा घेतला. ज्येष्ठ व्यक्तींना रांगेत बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावीठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय असावीयासाठी परिसरातील गुरूद्वारांना आवाहन करावेत्याचप्रमाणे रेल्वेस्थानकावरून चैत्यभूमीपर्यंत बसची शटल सेवा सुरू ठेवावी असे निर्देश त्यांनी दिले. यासह दिशादर्शक फलकरात्री पुरेशा लाईटची सुविधारेल्वेस्थानक परिसर अनधिकृत फेरीवालेमुक्त करणेजीवरक्षक बोटींची व्यवस्थापाण्याच्या टँकर्सची व्यवस्थावैद्यकीय पथकेसमन्वय कक्ष आदी बाबींचा त्यांनी आढावा घेतला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री.गगराणीकोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुखमुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरपश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापकआदींनी त्यांच्या यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली. भदंत डॉ.बोधीमहापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदींनी शासनामार्फत करण्यात येत असलेल्या सोयी सुविधांबाबत समाधान व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi