Monday, 16 December 2024

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्री परिषदेची बैठक

 मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

 

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला

मंत्री परिषदेची बैठक

 

नागपूरदि. 15 :- महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रामगिरी या शासकीय निवासस्थानी राज्य मंत्री परिषदेची बैठक झाली.

या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळात नवनियुक्त सदस्य मंत्रीराज्यमंत्री उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी राज्याचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसा शोक प्रस्ताव मंत्रिपरिषदेने मंजूर केला.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi