पर्यटकांचे आकर्षण केंद्र म्हणून नाशिकचा विकास करावा
पर्यटकांचे आकर्षण केंद्र म्हणून नाशिक जिल्ह्याला विकासित करावे. श्रीरामाचा जन्म जरी अयोध्येत झाला असला तरी श्रीरामाचा बराचसा काळ नाशिकमध्ये गेल्याचा इतिहास आहे. केंद्रीय विशेष सहाय्य योजनेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला 'राम-काळ-पथ' योजनेसाठी निधी मंजूर झाला असून त्यामाध्यमातून रामाचा इतिहास सांगणारे थीम पार्क तयार करण्यात यावे, अशा सूचना मंत्री श्री.देसाई यांनी दिल्या. पर्यटन धोरणांची अंमलबजावणी, पर्यटन विषयक योजना, पदांचा सविस्तर आढावा देखील त्यांनी यावेळी घेतला.
खनिकर्म विभागाचा आढावा घेत असताना मंत्री श्री. देसाई म्हणाले की, खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे नियंत्रण सुलभ होण्यासाठी ‘एकात्मिक खाणपट्टा व्यवस्थापन संगणकीय प्रणाली’ राबविण्यात यावी, जेणेकरुन अवैध खनिज वाहतुकीला आळा बसून महसूल वाढीस चालना मिळेल.
राज्यातील वीर पत्नी, वीर माता-पिता, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांचे कल्याण व पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील. तसेच सैनिक कल्याण विभागात कंत्राटी मनुष्यबळ भरताना आजी व माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना मंत्री श्री.देसाई यांनी दिल्या. तसेच महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळांतर्गत (मेस्को) माजी सैनिकांना रोजगार उपलब्ध करुन देताना सुरक्षा रक्षकांबरोबरच लिपिक, तांत्रिक पदासाठी भरती प्रक्रिया राबवावी, असेही त्यांनी यावेळी सूचविले. तसेच त्यांनी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर व मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, नाशिक यांच्याही कामकाजाचा आढावा घेतला.
No comments:
Post a Comment