Friday, 29 November 2024

गोंदिया जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत

 गोंदिया जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील

 मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत

-         मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबईदि. 29 : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसला झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळामार्फत 10 लाख रुपयांची मदत देण्यात येईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेतआवश्यकता वाटल्यास जखमींना खागी रुग्णालयात दाखल करावेअशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेतअशी सूचनाही त्यांनी दिली.

            अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहेअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi