Saturday, 23 November 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज

·         मतमोजणी केंद्रात मोबाईलइलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई

·         ईव्हीएम मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय प्रत्येकी १४ टेबल

·         टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठीही एकूण ३६ टेबल

मुंबई दि. २२  :- मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी दहा वेगवेगळ्या मतमोजणी केंद्रांवर होणार आहे. मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

मतदान केंद्रांवरील आवश्यक त्या सोयीसुविधा व उपाययोजनांबाबत मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादवसंबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हे पाहणी करुन सातत्याने आढावा घेत आहेत.

मतमोजणी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधीमतमोजणीसाठी नियुक्त अधिकारीकर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. मा. भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून धारावी विधानसभा मतदारसंघासाठी सत्यप्रकाश टी.एल. (भा.प्र.से.)सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघासाठी केदार नाईकवडाळा विधानसभा मतदारसंघासाठी विक्रम सिंह मलिकमाहिम विधानसभा मतदारसंघासाठी हिमांशु गुप्तावरळी विधानसभा मतदारसंघासाठी समीर वर्माशिवडी विधानसभा मतदारसंघासाठी के. सी. सुरेंदरभायखळा विधानसभा मतदारसंघासाठी अंजना एम.मलबार हिल विधानसभा मतदारसंघासाठी रवींद्र नाथ गुप्तामुंबादेवी विधानसभा मतदारसंघासाठी शिल्पा शिंदे,  कुलाबा विधानसभा मतदारसंघासाठी मोहम्मद रेहान रझा ‌यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

मतदान यंत्रातील (ईव्हीएम) मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर  स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक  सूक्ष्म निरीक्षकएक मतमोजणी पर्यवेक्षकएक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारीकर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच टपाली मतमोजणीसाठी वडाळामाहिम आणि वरळी विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ०५ टेबलभायखळा आणि कुलाबा विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ०४धारावीशिवडी आणि मलबार हिल  विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ०३ टेबल तर सायन कोळीवाडा आणि मुंबादेवी मतदारसंघासाठी प्रत्येकी ०२ असे एकूण ३६ टेबल असतील. सेवा मतदारांच्या पुर्वमतमोजणीसाठी जिल्ह्यातील १०  विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी एक असे एकूण १० टेबल असतील. सकाळी ०८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होईल.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी फेऱ्या

धारावी विधानसभा मतदारसंघ – १९ मतमोजणी फेऱ्या,  सायन-कोळीवाडा – २०वडाळा -१६माहीम – १८वरळी – १७शिवडी – १९भायखळा – १९मलबार हिल – २०मुंबादेवी – १७कुलाबा – १९ अशा मतमोजणी फेऱ्या होणार आहेत. 

सैनिक मतदारांच्या मतपत्रिका छाननीसाठी स्थापित ईटीपीबीएमएस कक्षएनकोअर प्रणालीवर माहिती भरण्यासाठी स्थापित कक्षसर्व मतमोजणी कक्षातील फेरीनिहायउमेदवारनिहाय आकडेवारीची सारणी तयार करण्यासाठी स्थापित टॅब्युलेशन कक्ष आदी विविध कक्षात अधिकारीकर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीनंतर ईव्हीएम आणि सांविधानिक व असांविधानिक लिफाफे सील करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळी पथके गठित करण्यात आली आहेत.

प्रत्येक टेबलवर उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना त्या टेबलवर कोणकोणत्या मतदान केंद्रावरील मतमोजणी होणार आहेयाबाबत माहिती देणारे फलक मतमोजणी कक्षात लावण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करताना पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच प्रवेशद्वारापासूनच मतमोजणी प्रतिनिधी आणि मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारीकर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जागोजागी दिशादर्शक फलक लावून मतमोजणी कक्षातील प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली आहे.

मतमोजणी केंद्राच्या ३०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू

जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेतनिर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने  मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या संदर्भात गुंतलेला अधिकारी किंवा अशा मतमोजणी केंद्रावर किंवा त्यांच्या परिसरात कर्तव्यात गुंतलेल्या कोणत्याही लोकसेवकाशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने मतमोजणी केंद्रापासून अथवा मतमोजणी केंद्राच्या परिसरापासून ३०० मीटर त्रिज्येच्या अंतरातमहामार्ग रस्तागल्लीबोळ किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरणे किंवा कोणत्याही लोकांच्या सभा किंवा गट तयार करण्यास व सामील होण्यास मनाई असेलअसे आदेश पोलीस प्रशासनाने निर्गमित केले आहेत.

मतमोजणी केंद्र परिसरात स्वतंत्र मीडिया सेंटर तयार करण्यात आले असून भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकारपत्र (पासेस) दिलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. प्रसार माध्यम प्रतिनिधींना सुध्दा केवळ मीडिया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल मीडिया सेंटर येथे जमा करावा लागेल.

मतदार संघ व मतमोजणी केंद्र

धारावी - भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुलतळमजलाकिचन रूमधारावी बस आगाराच्या जवळसायन वांद्रे लिंक रोडधारावीमुंबई - ४०००१७.

सायन कोळीवाडा - न्यू सायन मुन्सिपल स्कूलप्लॉट नंबर 160/ 161, स्कीम सहारोड नंबर 28, लायन ताराचंद बाप्पा हॉस्पिटल जवळसायन पश्चिममुंबई-४०००२२.

वडाळा - बीएमसी नवीन इमारतसीएस नंबर ३५५ बीस्वामी वाल्मिकी चौकहनुमान मंदिरासमोरविद्यालंकार मार्गअँटॉप हिलमुंबई-३७

माहीम - डॉक्टर अँटनिओ डी'साल्व्हिया हायस्कूलएमरोल्ड हॉलदादरमुंबई-28.

 वरळी - पश्चिम रेल्वे जिमखाना हॉलसेनापती बापट मार्गमहालक्ष्मी क्रीडा मैदान

शिवडी - ना. म. जोशी मार्गबीएमसी प्राथमिक शाळा क्रमांक दोनलोअर परळमोनो रेल स्टेशन जवळना.. जोशी मार्गकरी रोडमुंबई-११.

भायखळा - रिचर्डसन अँड क्रूडास लिमिटेडतळमजला हॉलजे जे रोडह्युम हायस्कूल जवळभायखळामुंबई-०८

मलबार हिल - विल्सन कॉलेजतळमजलारूम नंबर १०२१०४नेताजी सुभाष चंद्र मार्गगिरगाव चौपाटीचर्नी रोडमुंबई-०७.

मुंबादेवी - तळमजलागिल्डर लेनबीएमसी शाळामुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन समोरमुंबई सेंट्रल पूर्वमुंबई-०८.

कुलाबा - न्यू अप्लाइड आर्ट असेंबली हॉल (एक्झिबिशन हॉल)जे जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्सडॉ. डी. एन. रोडफोर्टमुंबई -

*****

शैलजा पाटील/विसंअ/

 

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi