Friday, 22 November 2024

महाराष्ट्र विधानसभा 2024 करिता झालेल्या निवडणुकीत झालेल्या मतदानातील पुरूष, महिला व तृतीयपंथी यांची अंतिम आकडेवारी जाहीर

 महाराष्ट्र विधानसभा 2024 करिता झालेल्या निवडणुकीत झालेल्या मतदानातील

पुरूषमहिला  तृतीयपंथी यांची अंतिम आकडेवारी जाहीर

 

            मुंबईदि. 22 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या 288 मतदारसंघांकरिता दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान झालेया मतदानात एकूण 6 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदारांनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण 3 कोटी 34 लाख 37 हजार 57 पुरूष3 कोटी 6 लाख 49 हजार 318 महिला तर 1 हजार 820 इतर मतदारांनी मतदान केले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

            या निवडणुकीत झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रकाशित झाली आहे. यात प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांचा समावेश आहेप्रत्यक्ष मतमोजणी करतांना टपाली मतदानाचा समावेश करण्यात येईलत्याचप्रमाणे मतदान केंद्राध्यक्षाद्यारे भरण्यात आलेला 17 सी हा प्रत्यक्ष झालेल्या मतदानासंदर्भातील फॉर्म उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही देण्यात आला असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.


--

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi