Friday, 18 October 2024

व्यवहारी जीवनात माणसांचे चार प्रकार पडतात.* ते खालील प्रमाणे...सामाजिक

 *व्यवहारी जीवनात माणसांचे चार प्रकार पडतात.* 

ते खालील प्रमाणे...

१) अंधाराकडून अंधाराकडे जाणारी माणसे. 

२) अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी माणसे. 

३) प्रकाश याकडून अंधाराकडे जाणारी माणसे. 

४) प्रकाशकडून प्रकाशाकडे जाणारी माणसे. 

(अंधार म्हणजे अज्ञान, आणि प्रकाश म्हणजे ज्ञान) 

*१) अंधाराकडून अंधाराकडे जाणारी माणसे!*

ही गरीब, कष्टकरी असतात. चिंता ,व्याकुळता त्यांना सतावते. आपल्या परिस्थितीचा विचार न करता ती इतरांना दोष देतात. ते कर्माला दोष देतात. आपले जीवन बदलेल अशी त्यांना अशा नसते. ती वर्तमानात ही दुःखी आणि भविष्यातही दुःखी असतात. यांच्यात उमेद अशी नसते. नेहमी चिडचिड असल्याने रागिष्ट बनतात. थोडक्यात आत्मविश्वास गमावलेली, ध्येयशी फारकत असणारी ही माणसे असतात. त्यामुळे त्यांचे जीवन दुःखमय असते!

*२) अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी माणसे!*

ही माणसे प्रयत्नवादी असतात. आपण आपली परिस्थिती आपण बदलू शकतो, असा आत्मविश्वास त्यांच्यात असतो. अधिक कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. ते भविष्यावर विश्वास ठेवणारे असतात. शेजारच्या लोकांची स्थितीचे ते निरीक्षण करतात. आपलाही बदल झाला पाहिजे. या विचाराने सतत कष्ट आणि कष्ट करतात. बदलाचा आशावाद त्यांच्यात असतो. वर्तमानात येणाऱ्या संकटाशी मुकाबला करण्याची त्यांची तयारी असते. कारण त्यांच्या प्रगतीची दिशा त्यांनी निश्चित केलेली असते. हळूहळू का होईना आपला प्रवास ते प्रगतीच्या दिशेने करतात. 

कारण ते अंधाराकडून प्रकाशाकडे प्रवास करणारे असतात!

*३) प्रकाशा कडून अंधाराकडे जाणारी माणसे.*

ही माणसे वंश परंपरागत श्रीमंत असतात. कष्टाशिवाय श्रीमंती लाभल्याने श्रीमंतीचे महत्त्व त्यांना वाटत नाही. धन दौलतिने त्यांना प्रतिष्ठा आपोआप चालून आलेले असल्याने ते इतरांना हिणकस वागणूक देतात. कमी लेखतात .टोचून बोलतात. तसा त्यांचा स्वभावच बनलेला असतो. स्वतःला भाग्यशाली समजतात आणि दुसऱ्याचा हेवा करतात. बोलण्यातून ,वागण्यातून आपल्या श्रीमंतीचे हे लोक प्रदर्शन करत असतात. भविष्यकाळाचा ही विचार करत नाहीत.. श्रीमंतीमुळे कष्ट करणे विसरतात आळशी बनतात. त्यामुळे स्वतःहून दुःखाची बीजे आपल्या आयुष्यात पेरतात. माणसाचा तिरस्कार करण्याची प्रवृत्ती असल्याने त्यांना मित्र फारच कमी असतात. भविष्यातल्या दिवसां विषयी ते बेफिकीर असतात. उधळी स्वभाव असतो. आणि पुढे भविष्यात यांचा प्रवास नकळत प्रकाशाकडून अंधाराकडे जातो! 

*४) प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारी माणसे!*

ही माणसे सतत जागृत असतात. भविष्यातील पुढील दिवसांचा सकारात्मक विचार करतात. चिंतन शील असतात. यांना गर्व ,अहंकार नसतो. नम्रता विनयशीलता अंगी असते. हे सतत आनंदी असतात. आणि दुसऱ्याला ही आनंद देतात. हे कोणाचा हेवा करत नाहीत. प्रेमळ असतात. रागिष्ट नसतात. यांच्या प्रवासाच्या वाटा या प्रकाशवाटा असतात. संकट रुपी अडथळे यांना येत नाहीत. आणि आलेच तर आनंदाने स्वीकारतात. त्यातून मार्ग काढतात. प्रयत्नशील असतात. प्रसन्न असतात. म्हणून त्यांचा जीवन प्रवास प्रकाश कडून प्रकाशाकडे असतो!

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi