Thursday, 17 October 2024

राजधानीत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

 राजधानीत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

 

नवी दिल्ली१५ : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.

दिल्लीतील कॉपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अपर निवासी आयुक्त नीवा जैनसहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवारस्मिता शेलार तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

परिचय केंद्रात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi